सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची काढली निविदा

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 26 मे 2017

राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, हेलिपॅडच्या परिसरात उभारलेल्या खांबाला हेलिकॉप्टरचा पंखा लागल्याने निलंग्यातील दुर्घटना झाली. त्यानंतर मात्र नेहमीच दबावाखाली काम करणारे महापालिकेचे प्रशासनाला जाग आली...

सोलापूर: येथील सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. निलंगा (जि.लातूर) येथे गुरुवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉफ्टर दुर्घटनेचा धसका घेत ही निविदा तातडीने काढली आहे. 

सोलापूर विमानतळावरून विमान सेवा करण्यास सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, हेलिपॅडच्या परिसरात उभारलेल्या खांबाला हेलिकॉप्टरचा पंखा लागल्याने निलंग्यातील दुर्घटना झाली. त्यानंतर मात्र नेहमीच दबावाखाली काम करणारे महापालिकेचे प्रशासनाला जाग आली आणि नगर अभियंता कार्यालयाने निविदा काढली. 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध कारखाना व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने 12 जूनला म्हणणे मांडण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. चिमणी पाडकामाच्या आदेशाला स्थगिती देता येणार नाही, स्थगितीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे अपील करता येईल, असे न्यायालयाने कारखाना व्यवस्थापनास सांगितले आहे. दरम्यान, चिमणीबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत बैठक होणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी वाचा:

मोदींचा करिष्मा अजूनही कायम

काळा पैशाला आळा; आता रोजगारनिर्मिती हवी

स्मार्ट सिटी मिशनला गती मिळेना

दिशाभूल करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी

घोषणांचा महापूर, शेतकरी कोरडाच

मोदीसत्ताक!

हायस्पीड रेल्वेला आता द्यावे प्राधान्य

'एफडीआय'ने उद्योगांना चालना