महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

सोलापूर - सोलापूर महापालिकेतील १५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आज आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंजूर केला. महापालिकेच्या एकाच विभागात वर्षानुवर्षे तळ ठोकून असलेल्या काही कर्मचाऱ्यांचा या बदल्यांत समावेश आहे. मुख्यालयातून झोन कार्यालयात अनेक मातब्बर कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा झाल्या आहेत. 

अधीक्षक, सहायक अभियंता, उपअभियंता, आरोग्य निरीक्षक, भूमापक, मुख्य लेखनिक, अवेक्षक यासह इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. विभाग कार्यालय सहामधील पी. एम. दिवाणजी यांची बदली नगर अभियंता कार्यालयात झाली आहे. मुख्य लेखापरीक्षक ए. आर. एम. मुंढेवाडी यांची बदली बांधकाम परवाना विभागात झाली आहे. विभागीय कार्यालय क्र. पाचचे ए. व्ही. अंत्रोळीकर यांची बदली नगर रचना कार्यालयात झाली आहे. अतिक्रमण विभागातील विजय राठोड यांची बदली सार्वजनिक आरोग्य विभागात झाली आहे. महापालिका प्रशासनात गेल्या काही दिवसांपासून आलेली मरगळ या बदल्यांमुळे बदलण्याची आशा निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सगळ्याच कामाचा अनुभव मिळाला पाहिजे. एकाच ठिकाणी जास्त दिवस काम केल्यानंतर अनुभवाने उद्धटपणा येण्याची शक्‍यता असते. हा विचार करून महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे हीत डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. 
- डॉ. अविनाश ढाकणे,  आयुक्त, सोलापूर महापालिका