सोलापूर महापालिकेतील विरोधकांचे तेलही गेलं अन्‌ तूपही... 

सोलापूर महापालिकेतील विरोधकांचे तेलही गेलं अन्‌ तूपही... 

सोलापूर - काहीही झाले तरी यंदा कमळाला गाडणारच अशी गर्जना युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी केली असताना त्याच कमळाशी युती करुन महापालिकेतील शिवसेनेने  तीन सभापतीपद पदरात पाडुन घेतले. या खेळीमुळे इतर विरोधकाना एकही सभापतीपद मिळाले नाही.

महापालिका विशेष समिती सभापती निवडणुकीत विरोधक एकत्रित येतील आणि गतवर्षीप्रमाणे सत्ताधाऱ्यांना "हैराण' करतील असे वाटत असताना विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी ऐनवेळी आपले "पत्ते' सत्ताधाऱ्यांच्या बाजूने टाकले आणि त्यामुळे विरोधी पक्षांना अपेक्षित असलेले "तेलही गेले अन्‌ तूपही'. त्यामुळे अण्णांची खेळी यशस्वी ठरली. 

गेल्या वर्षी झालेल्या समिती सभापतीच्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्रित आल्याने सत्ताधारी भलतेच हैराण झाले होते. त्या वेळी सभागृहनेते सुरेश पाटील यांच्याकडे सूत्रे असतानाही सत्ताधाऱ्यांना घाम फुटला होता. यंदा श्री. पाटील आजारी असल्याने त्यांचा सक्रिय सहभाग नव्हता. त्यामुळे यंदा सर्व विरोधक एकत्रित येऊन सत्ताधाऱ्यांचा वचपा काढतील, अशी चर्चा होती. मात्र, उलटेच घडले. कोणालाही अपेक्षित नसताना श्री. कोठे यांनी भाजपशी युती करत सर्वांनाच धक्का दिला आणि सर्व सभापतींच्या निवडीही बिनविरोध करून दाखवल्या. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदावरून भाजपमध्ये पुन्हा वाद सुरू झाले होते. सहकारमंत्री गटाकडून संगीता जाधव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पद्मशाली समाजाला न्याय द्यायचा म्हणून अनिता कोंडी आणि रामेश्‍वरी बिर्रू यांच्यात रस्सीखेच होती. अखेर बिर्रू यांना संधी मिळाली. मात्र, यामुळे सहकारमंत्री गट नाराज झाला आणि संतोष भोसले यांनी संधी असतानाही उमेदवारी दाखल केली नाही. या पार्श्‍वभूमीवर सर्व विरोधक एकत्रित येतील असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. 

महिला व बालकल्याणवरूनच फिस्कटले 
महिला व बालकल्याण समिती कॉंग्रेसला मिळावी असा आग्रह धरण्यात आला होता. मात्र शिवसेनेला तो मान्य न झाल्याने विरोधकांमधील बोलणी फिस्कटल्याचे समजते. आता यापुढे भाजप-शिवसेना एकत्रित राहिली तर कॉंग्रेसला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com