रेडीरेकनरच्या दरानुसार  विकास शुल्काची आकारणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

सोलापूर - महापालिका हद्दीतील रहिवास, औद्योगिक व व्यावसायिक मिळकतींसाठी आता रेडीरेकनरच्या दरानुसार विकास शुल्क गुरुवारपासून आकारण्यात येणार आहे. यापूर्वी वसाहतीनुसार कर, या पद्धतीने विकास शुल्क घेतले जात होते. 

बांधकाम परवानगी देताना हे विकास शुल्क आकारले जाईल. यापूर्वी रहिवास विभागासाठी प्रती चौरस मीटर २२ रुपये, औद्योगिक क्षेत्रासाठी ३३ रुपये प्रती चौरस मीटर आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी प्रती चौरस मीटर ४४ रुपये विकास शुल्क घेतले जात होते. याशिवाय, बांधकाम विकास शुल्क, जिना, पॅसेज, टेरेस प्रिमिअम रेडीरेकनरच्या २० टक्के, बाल्कनी प्रिमिअमसाठी एक हजार रुपये प्रती चौरस मीटर शुल्क घेतले जात होते. त्यात आता बदल करण्यात आला आहे. 

पूर्वी प्रती चौरस मीटरने आकारणी होत असल्याने पालिकेच्या उत्पन्नात कमी भर पडत होती. आता सरसकट रेडीरेकनरच्या किमतीनुसार आकारणी होणार आहे. त्यामुळे तब्बल पावणेदोनपट उत्पन्नात भर पडणार आहे. मुंबई मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक व व्यावसायिक वापरासाठी जमिनींच्या व इमारतींच्या निरनिराळ्या स्वरूपाच्या प्रकारच्या विकासासाठी आकारले जाणारे विकास शुल्क हे प्रस्तावित आकाराच्या दीडपट किंवा दुप्पट असणार आहेत.