एसटी कामगारांचा 17 पासून बेमुदत संप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सोलापूर - राज्यातील एसटी कामगारांना पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू न केल्यास 17 ऑक्‍टोबरपासून राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही हा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे; मात्र त्यांनी ती मान्य करण्यास नकार दिला आहे. एक जुलैपासून देय असलेला सात टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला असून, त्याला एक वर्षाचा कालावधी झाला आहे; मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर जानेवारी 2017 पासून राज्य शासनाने लागू केलेला चार टक्के महागाई भत्ताही एसटी कर्मचाऱ्यांना लागू केला नाही. महागाई भत्ता संपूर्ण थकबाकीसह कामगारांना त्वरित देण्याची मागणी संघटनेने केली आहे. या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटनेसमोर संप करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे मतही ताटे यांनी व्यक्त केले.