एसटी कर्मचाऱ्यांकडून दिवाकर रावते यांचा निषेध 

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

कामावर असताना वडा पाव घालवून वेळेवर व सुरक्षित सेवा देवूनही मागण्याकडे दूर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी गाढवालाच वडापाव खावू घातला. दरम्यान सायंकाळच्या सत्रात सोलापुरातील राज्य परिवहन विभागीय कार्यलयाने पत्रक काढून 11 आदेशच जारी केले आहे हे आदेश सोशलमिडीयातून फिरू लागल्याने या तोडगा निघण्याऐवजी हा संप चिघळण्याचीच चिन्हे दिसू लागली.

मंगळवेढा : ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा आज चौथा दिवस असून, सरकारने याबाबत तोडगा न काढल्यामुळे मंगळवेढा आगाराच्या प्रवेशद्वारात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा निषेध व्यक्त करित गाढवाला हार घालून वडा पाव जावू घातला. 

तिसऱ्या दिवशी ही बसस्थानकावर शुकशुकाट होता. सर्व एसटी आगारात असून प्रवेशद्वाराच्या समोर एसटी विवीध संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष रामेश्वर मासाळ, तानाजी खरात आखील भारतीय छावा संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला.   

संपामुळे सणासुदीच्या दिवसात प्रवासाचे मात्र हाल सुरूच आहेत. अन्य आगारात कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. संपामुळे पंढरपूर, सोलापूर, सांगोला, पुणे तर ग्रामीण भागातील हुन्रूर, शिरनांदगी, लवंगी, सिध्दापूर आदीमा मार्गावर  खासगी वाहनाधारकाकडून जादा दराने आकारणी करण्यात येत होती. त्यामुळे खासगी वाहन धारकांची दिवाळी दणदणीत होत आहे. मात्र अल्पशा पगारावर पिढानपिढ्या काम करणाय्रा कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र आंधारात होत असताना परिवहनमंत्री बेजबाबदार वक्तव्य करू लागल्याने कामगारात संताप व्यक्त केला जात आहे.