राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे 18 सप्टेंबरला वितरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षी राज्यातील 108 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण 18 सप्टेंबरला सोलापूर येथे होणार आहे. यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री उपस्थित राहणार आहेत.

राज्य शिक्षक पुरस्कार व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण सोलापुरात करण्याचा मनोदय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला होता. त्यानुसार हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे होत असल्याचे बोलले जाते. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह राज्यमंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे होणार असल्यामुळे त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी तयारी करू लागले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा पहिल्यांदाच सोलापूर येथे होणार आहे.