सोलापुरातील सख्ख्या बहिणींना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 

संतोष सिरसट
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सोलापूर - राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा केली. सोलापूर जिल्ह्यातील दोन सख्ख्या बहिणींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सात बहिणी व एक भाऊ अशा आठ भावंडांपैकी चार बहिणी व एक भाऊ असे पाच जण शिक्षक आहेत. या आठ भावंडांचे वडील मिल कामगार होते. 

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर-बाळे येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सरस्वती पवार, तर सोलापूर शहरातील निर्मलाताई ठोकळ प्रशालेत कार्यरत असलेल्या माध्यमिक शिक्षिका आशा भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही शिक्षिकांचे वडील मनोहर गरड हे मिलमध्ये कामगार होते, तर आई सुमन या गृहिणी आहेत. या गरड दांपत्यांना आठ मुले आहेत. त्यामध्ये सात मुली, तर एका मुलाचा समावेश आहे. अतिशय काबाडकष्ट करून या आठही मुलांना या दांपत्याने चांगले शिकविले. त्याचे सार्थकही झाले. आठपैकी पाच जण सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यातील दोन बहिणींना राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.