सोलापुरातील ऊसदर रविवारी ठरणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सोलापूर - कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराची कोंडी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुटली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी रविवारी (ता. 12) किंवा सोमवारी (ता. 13) सुटण्याची शक्‍यता आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक बोलाविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

राज्यातील सर्वांत जास्त साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उसाची कोंडी अद्यापही फुटलेली नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये ही कोंडी कायम असल्याने कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे कारखानदार एकत्र आले आहेत, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी एकत्र आल्या आहेत.