खट्टर अननुभवी मुख्यमंत्री : सुशीलकुमार शिंदे

विजयकुमार सोनावणे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात छेडले असता
शिंदे म्हणाले, "मी काल त्यांच्याशी बोललो आहे. ते उद्या (रविवारी)
सोलापुरात होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.''

सोलापूर : "डेरा सच्चा सौदा' प्रकरण हाताळण्यात हरियाना सरकारला अपयश आले आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे अननुभवी मुख्यमंत्री आहेत, असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

कॉंग्रेस भवनात शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "या घटनेचे पडसाद हरियानासह पंजाब, राजस्थान आणि दिल्लीमध्ये उमटले. हरियानामध्ये परिस्थिती हाताळता आली नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान सोसावे लागले. त्याचवेळी पंजाबमध्ये मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात तेथील सरकारला यश आले आहे. मुख्यमंत्री खट्टर यांच्या अनअनुभवाचे परिणाम स्थानिक राज्यकर्त्यांना तसेच दिल्लीतल्या राज्यकर्त्यांनाही बसणार आहे.''

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात छेडले असता
शिंदे म्हणाले, "मी काल त्यांच्याशी बोललो आहे. ते उद्या (रविवारी)
सोलापुरात होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.''