कर संकलन विभागाकडून नऊ लाखांची वसुली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून कर वसुलीसाठी कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. 19) केलेल्या कारवाईत सात नळाच्या जोडण्या तोडण्यात आल्या तसेच नऊ लाख 77 हजार 336 रुपयांची कर वसुली करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे कर आकारणी व कर संकलन प्रमुख आर. पी. गायकवाड यांनी दिली. 

मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या कर विभागातर्फे कर वसुलीची मोहीम राबविली जात आहे. सोमवारी दक्षिण सदर बझार येथे केलेल्या कारवाईत पाच नळांची जोडणी तोडण्यात आल्या. तसेच पाच लाख 30 हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला. सोमवारी रविवार पेठ, रेल्वे लाइन्स, दक्षिण सदर बझार, उत्तर सदर बझार येथे कारवाई करण्यात आली. आणखी काही दिवस ही कारवाई सुरू असल्याचे आर. पी. गायकवाड यांनी सांगितले. एक लाखाच्या पुढे कर थकीत करणाऱ्या नागरिकांची नावे शहरातील मुख्य चौकात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यासाठीचे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सध्या चार कंत्राटदारांनी निविदा भरली आहे. मात्र, त्यातील दोघांकडे परवाना व पॅन कार्ड नसल्याने तूर्तास याला विलंब लागेल. निविदा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून यानंतर कमी किमतीत काम करणाऱ्या ठेकेदारास कंत्राट देण्यात येणार आहे. चौकात लावण्यात येणाऱ्या डिजिटल बॅनरवर थकबाकीधारकांची नावे प्रसिद्ध झाल्यास महापालिकेचा कर ते लवकर भरतील, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स