ट्रकच्या धडकेने तीन विद्यार्थी ठार

ट्रकच्या धडकेने तीन विद्यार्थी ठार

सोलापूर - तुळजापूर रोडवर हिप्परगा गावाजवळ रविवारी रात्री ट्रकने विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक मुलगा जखमी आहे. संगमेश माळगे, दीपक गुमडेल आणि अक्षय आसबे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर गंभीर जखमी हेमंत थळंगेवर अश्‍विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यायात शिक्षण घेत होते. परीक्षा जवळ आल्यामुळे ते रात्रभर कॉलेजच्या ग्रंथालयात अभ्यास करीत बसले होते.

मध्यरात्री तीनच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी बाहेर पडले. तुळजापूर महामार्गावर ते येताच त्यांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. दीपक गुमडेल हा पार्क चौकातील रेमंड शोरूमच्या मालकांचा मुलगा आहे. तर अक्षय आसबे हा पंढरपूरचा आहे. तिघेही मुले त्यांच्या कुटुंबात एकुलते एक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com