शिक्षणमंत्री तावडे यांच्या अंगावर उधळला भंडारा, पत्रके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिलेच पाहिजे. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष यावेळी करण्यात आला. राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे होता. ​उमेश काळे, शरानु हांडे, शेखर बांगळे, अनिल घोडके, मळाप्पा नवले यांनी तावडे यांच्यावर भंडारा उधळला.

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पाच जणांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर पत्रके व भंडारा उधळल्याची घटना घडली.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिलेच पाहिजे. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष यावेळी करण्यात आला. राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे होता. ​उमेश काळे, शरानु हांडे, शेखर बांगळे, अनिल घोडके, मळाप्पा नवले यांनी तावडे यांच्यावर भंडारा उधळला. या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याविषयी बोलताना तावडे म्हणाले, की सिनेटने राज्य सरकारकडे तीन नावे सुचवली आहेत. अहिल्यादेवी, बसवेश्वर व जिजाऊ या तीन नावांवर शासन योग्य तो निर्णय घेईल. काही लोकांना फार घाई असते. वृत्तपत्रांत फोटो येतो. मात्र त्यांचा भावना चांगल्या असतात, त्या योग्य पद्धतीने मांडल्या जात नाहीत. राज्य शासन यावर योग्य निर्णय घेईल. येळकोट येळकोट जय मल्हार.