सोलापूर विद्यापीठ नामांतरासाठी शिवा संघटनेचा विराट मोर्चा

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सोलापूरः सोलापूर विद्यापीठाला श्री सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवा संघटना व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (सोमवार) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी शहर, जिल्ह्यातील आणि कर्नाटक मधील जवळपास 70-75 हजाराच्या संख्येने लिंगायत बांधव एकवटले होते.

येथील कौतम चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली. शहरातील विविध मार्गवरुन निघलेला मोर्चा होम मैदानावर पोहचला. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, धर्मराज काडादी यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले. श्री सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी मागील 13 वर्षापासून लढ़ा सुरु आहे. विद्यापीठाला नाव न दिल्यास तीव्र स्वरूपात अंदोलन छेडण्याचा इशारा शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :