सोलापुरात झेंडूला मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सोलापूर - दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या उत्सवामध्ये मागणी असलेल्या झेंडूची आवक आणि दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी वधारले. गुरुवारी झेंडूला सर्वाधिक प्रतिकिलो 70 रुपये इतका दर मिळाला.

दसरा-दिवाळीच्या उत्सवात झेंडूला मोठी मागणी असते, हे लक्षात घेऊन शेतकरीही या हंगामात काढणीस येईल, अशा पद्धतीने झेंडूची लागवड करतात. सोलापूरसह नजीकच्या उस्मानाबाद, सांगली आणि सातारच्या काही भागातूनही झेंडू सोलापूर बाजार समितीच्या आवारात येतो. गेल्या आठवड्यापासून आवकेत सातत्याने वाढ होते आहे. पण मागणीच्या तुलनेत आवक नाही. जुलै, ऑगस्ट या महिन्यात झेंडूची विशेषकरून लागवड होते. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या तोंडवरच झेंडू बाजारात येतो. गेल्या आठवड्यात झेंडूची आवक अगदी काहीच नव्हती. पण या सप्ताहात मात्र त्यात लक्षणीय वाढ झाली. पण मागणीही असल्याने झेंडूचे दर वधारले आहेत. झेंडूला प्रतिकिलोला किमान 20 रुपये, सरासरी 60 रुपये आणि सर्वाधिक 70 रुपये इतका दर मिळाला. स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरील व्यापारीही बाजारात आहेत. त्यामुळे झेंडूला चांगलाच उठाव मिळतो आहे.