जिल्हा परिषदेची भरती ऑनलाइन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

सोलापूर - राज्यात जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या पदांची भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे. 

सोलापूर - राज्यात जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या पदांची भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे. 

राज्यात नोव्हेंबरच्या महिन्यात एकाचवेळी ही परीक्षा होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ वाया जात होता. मात्र, या नव्या निर्णयामुळे वेळेची बचत होणार आहे. एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल. उमेदवाराने अर्ज करतानाच कोणत्या जिल्हा परिषदेत काम करण्याची इच्छा आहे त्याबाबत पर्याय निवडायचे आहेत. राज्यातील 34 जिल्हा परिषदेतून एक पर्याय उमेदवारांना निवडता येईल. प्रत्येक संवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे अधिकार त्या उमेदवाराच्या मूळ जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असणार आहेत. नियुक्ती झालेले उमेदवार संबंधित जिल्हा परिषदेमध्ये हजर न झाल्यास दुसऱ्या पसंतीची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या यादीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांनी त्यांना दिलेल्या जिल्हा परिषदेमध्ये हजर होऊन नियुक्तिपत्र घेणे बंधनकारक केले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्ती देतील, असाही उल्लेख ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयात केला आहे. 

टॅग्स