सोलापूर: भाजपच्या पराभवासाठी महापालिकेत विरोधक एकत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

एकुण 102 सदस्य असलेल्या महापालिकेत भाजप 49 आणि विरोधक 53 असे बल आहे. विरोधक एकत्रित राहिले तर भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. प्रत्येकी 9 सदस्य असलेल्या समित्यामध्ये भाजपचे 4 व विरोधकांचे 5 सदस्य आहेत.

सोलापूर - महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधक एकत्रित आले आहेत. त्यामुळे भाजप विरुध्द शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी बसप व एमआयएम असे चित्र निर्माण झाले आहे.

एकुण 102 सदस्य असलेल्या महापालिकेत भाजप 49 आणि विरोधक 53 असे बल आहे. विरोधक एकत्रित राहिले तर भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. प्रत्येकी 9 सदस्य असलेल्या समित्यामध्ये भाजपचे 4 व विरोधकांचे 5 सदस्य आहेत.

शहर विकास आणि अंदाजपत्रकाबाबत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत निर्णय झाला. विरोधी गटातील सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.