दुहेरीकरणासाठी सोलापूर पॅसेंजर रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

मिरज - सोलापूर मार्गावर धावणाऱ्या मिरज-सोलापूर पॅसेंजर आणि कोल्हापूर-सोलापूर एक्‍स्प्रेस या गाड्यांना "ब्रेक' देण्यात आला आहे. 1 ते 5 फेब्रुवारीदरम्यान सोलापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे; तर 2 आणि 3 फेब्रुवारीला सोलापूर एक्‍स्प्रेस धावणार नाही. सोलापूर विभागातून ही माहिती देण्यात आली.

कुर्डुवाडी-सोलापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम या दिवशी करण्यात येणार असल्याने गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पुणे-सोलापूर मार्गावरून दक्षिणेत धावणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. सुमारे 15 गाड्या मिरजमार्गे दक्षिणेत सोडण्यात आल्या आहेत. दक्षिणेतून मुंबईला जाणाऱ्या काही गाड्याही मिरजमार्गेच धावतील. मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावरील रेल्वे वाहतूक मात्र नियमित सुरू राहील.

पश्चिम महाराष्ट्र

तीन कॉलन्यांची एकच मूर्ती - कलानंद, त्र्यंबोली, प्रगती कॉलनीतील नागरिकांचा अनुकरणीय पायंडा कोल्हापूर - कलानंद, त्र्यंबोली...

10.03 AM

साडेतीन कोटीची कामे रखडणार - शॉर्ट टर्म नोटिसीने फेरनिविदा कोल्हापूर...

09.45 AM

आयात गोळ्या - नमुने मुंबई प्रयोगशाळेला रवाना; आता "नागपूर मेड'चा वापर...

09.45 AM