सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग मंजूर

तात्या लांडगे
सोमवार, 23 जुलै 2018

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19 च्या योजनात नव्या रेल्वेमागार्चा समावेश करण्यात आला आहे.

सोलापूर : राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मागार्चा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून या मागार्मुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या व विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागार्बाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19 च्या योजनात नव्या रेल्वेमागार्चा समावेश करण्यात आला आहे.

सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मागार्मुळे उस्मानाबादच्या जनतेसाठी प्रवास सोयीस्कर होणार असून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूर व उस्मानाबादहून येणाऱ्या भाविकांचीही मोठी सोय होणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Solapur Tuljapur Osmanabad railway route approved