सोलापूर विद्यापीठातर्फे डी.लिट सुशीलकुमार शिंदे यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

सोलापूर - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाने डी.लिट (डॉक्‍टर ऑफ लिटरेचर) पदवी जाहीर केली आहे. डिसेंबर 2016 मध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षान्त समारंभात ही मानद पदवी शिंदे यांना देण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही पहिली डी.लिट पदवी आहे, अशी माहिती सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली.

शिंदे यांना डी.लिट. या मानद पदवीने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेचे समोर होता. अधिसभेच्या 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या 14 व्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. त्यास अधिसभेने सर्वानुमते मान्यता दिली.

सोलापूर विद्यापीठाने 2014 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सर्वप्रथम डॉक्‍टर ऑफ सायन्स (डी.एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. ही पदवी सोलापूर विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते देण्यात आली होती. सोलापूर विद्यापीठाची पहिली डी.लिट. पदवी ही श्री. शिंदे यांना देण्यात येणार आहे.
सुशीलकुमार शिंदे हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती होते. त्यांना आत्तापर्यंत चार विद्यापीठाने डी.लिट. पदवीने सन्मानित केले आहे.