सोलापूर : हातगाडे, फळ विक्रेते, रिक्षांवर कारवाई

वाहतुकीला अडथळा केल्याने १४ जणांवर गुन्हे दाखल
Action on hawkers fruit sellers rickshaws Charges filed against 14 persons for obstructing traffic solapur
Action on hawkers fruit sellers rickshaws Charges filed against 14 persons for obstructing traffic solapur File photo

सोलापूर : सार्वजनिक रस्त्यालगत रिक्षा उभी करणे, हातगाडी लावणे आणि फळविक्री करणाऱ्यांविरुध्द शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. फौजदार चावडी, जोडभावी पेठ, सलगर वस्ती पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) १४ ठिकाणी कारवाई करीत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करून ये-जा करणाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे.शहरात पार्किंगची पुरेशी सोय नाही, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत रस्ते अरुंद असल्याने पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. रस्त्यालगत हातगाडे, फळविक्रीचे गाडे, रिक्षा तथा अन्य वाहने उभी केली जातात.

त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन तेथून जाणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्‍वभूमीवर फौजदार चावडी पोलिसांनी एसटी स्टॅण्डजवळील शहा पेट्रोल पंप परिसरातील विक्रम लक्ष्मण भोवाळ यांच्या रिक्षावर तर चैतन्य हिरालाल वाघमारे, अजित नवनाथ बाबर यांच्या हातगाडीवर कारवाई करीत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले. दुसरीकडे जोडभावी पेठ पोलिसांनी घोंगडे वस्ती परिसरात विशाल दत्तात्रय सुरवसे याने अंडा आम्लेटची गाडी लावून रहदारीस अडथळा आणला. बलिदान चौकात कुल्फी विक्री करणारा हुसेन सलिम शेख याने रहदारीला अडथळा केला. रमेश मल्लिनाथ चाबुकस्वार याने रिक्षात फळविक्री करताना वाहतुकीला अडथळा केला. मार्केट यार्डसमोर अलीम अ.कादर बागवान याने फळविक्रीचा हातगाडा उभा केला होता. जिलानी अय्युबअली बागवान यानेही त्या परिसरात फळविक्रीचा गाडा लावला होता. जोडभावी पेठेत सतीश रामचंद्र शेखापुरे याने पावचटणीचा गाडा उभा केला होता. क्रांती चौकात मनोज रामबिरसिंग सिसोदिया याने होजीअरी कपड्याची विक्री रस्त्यालगतच सुरु केली होती. भूषण नगरातील इरण्णा वस्तीत अमोगसिध्द खंडेराव देवकर याने भजी विक्रीचा गाडा लावला होता. एजाज युसुफ खान याने भेळ विक्रीची हातगाडी साईबाबा चौक (लिमयेवाडी) येथे उभी केली होती. त्यांच्याविरुध्द जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

रस्त्यांवर रिक्षा नकोच

देगाव नाका परिसरातील कोयना नगरातील सार्वजनिक रोडवर जगन्नाथ भगवान लवटे याने तीनचाकी रिक्षा रस्त्यालगत उभी केली होती. दुसरीकडे समाधान यशवंत जाधव यानेही थोबडे वस्ती परिसरातील सार्वजनिक रोडवर त्याच्याकडील रिक्षा उभी करून वाहतुकीला व रहदारीला अडथळा निर्माण केला. त्या दोघांविरुध्द सलगर वस्ती पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होऊन तेथून ये-जा करणाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण होईल, अशाप्रकारे वाहन रस्त्यावर उभे करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com