विवाहानंतर पतीने दिली साथ अन्‌ विश्वास! पत्नी दुसऱ्याच प्रयत्नात झाली फौजदार

बारावीनंतर विवाह झाला आणि पुढील शिक्षण होईल की नाही, याची चिंता संजीवनी यांना लागली... पण, पती संगेश यांनी पत्नीचे शिक्षण पुढे सुरूच ठेवले. बीएड पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संजीवनीला फौजदार करण्याचे स्वप्न पाहिले आणि पतीच्या साथीने दुसऱ्याच प्रयत्नात संजीवनी फौजदार झाल्या.
psi sanjiweeni whatte
psi sanjiweeni whattesakal

सोलापूर : वडील बस वाहक, चार बहिणी आणि एक भाऊ, कौटुंबिक परिस्थिती जेमतेमच... बारावीनंतर विवाह झाला आणि पुढील शिक्षण होईल की नाही, याची चिंता संजीवनी यांना लागली... पण, पती संगेश यांनी पत्नीचे शिक्षण पुढे सुरूच ठेवले. बीएड पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संजीवनीला फौजदार करण्याचे स्वप्न पाहिले आणि पतीच्या साथीने दुसऱ्याच प्रयत्नात संजीवनी फौजदार झाल्या.

psi sanjiweeni whatte
'जुन्या पेन्शन'चा मार्ग खडतर! राज्याचे उत्पन्न अन्‌ वेतन,‌ पेन्शनवरील खर्चाचा बसेना ताळमेळ

अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील संजीवनी अंटद या बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. वडिलांनीही मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता शिकविले. काही महिन्यांनी संजीवनी यांचा विवाह उमरगा तालुक्यातील आलुरे येथील संगेश व्हट्टे यांच्याशी झाला. ग्रामीण भागात विवाहानंतर पुढे शिकविण्याचे प्रमाण तसे कमीच आहे. तरीदेखील, संजीवनी यांनी विवाहानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करून अक्कलकोटमधील लक्ष्मीबाई म्हेत्रे कॉलेजमध्ये ‘बीएड’ला प्रवेश घेतला. बीएड करत असतानाच त्यांनी विक्रीकर निरीक्षकाची (एसटीआय) परीक्षा दिली. पण, मुलाखतीतून त्यांना बाहेर पडावे लागले. त्यावेळी पती संगेश यांनी अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याचे सांगत पत्नी संजीवनीला धीर दिला. पुढच्यावेळी तू निश्चितपणे यशस्वी होशील, असा विश्वास दिला. त्यानंतर पुढे आयोगाची जाहिरात आल्यानंतर संगेश यांनी ‘पीएसआय’साठी अर्ज कर, तुला फौजदार झालेले पाहायला आवडेल, असे पत्नीला सांगितले. त्यादृष्टीने संजीवनी यांनी प्रयत्न केला आणि एकत्रित कुटुंब असल्याने घरातील सर्व कामे करून आणि सोबत त्यांच्या चिमुकल्याला घेऊन अभ्यास केला. संगेश यांनीही ‘एमपीएससी’साठी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. ते सध्या खासगी बॅंकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करतात. पतीने दिलेली साथ व त्यांच्या विश्वासामुळे संजीवनी यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय २०१५ मध्ये ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळविले आणि पतीचे स्वप्न पूर्ण केले.

psi sanjiweeni whatte
व्हायचे होते कृषी शास्त्रज्ञ अन्‌ झाले ‘आयपीएस’! CIDचे उपमहानिरीक्षक हिरेमठ यांची कहाणी

विवाहानंतरही शिकून स्वप्न पूर्ण करता येते

विवाहापूर्वीच शिक्षण घेऊन स्वप्नपूर्ती होते असे काहीही नसून, विवाहानंतरही सासरच्यांची विशेषत: पतीची साथ लाभल्यास यश मिळू शकते, हे संजीवनी व्हट्टे यांनी दाखवून दिले. मुलींना प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी असून त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करायला हवेत. जिद्द, चिकाटी, मेहनत सोडू नये. पतीच्या साथीने पत्नी यशस्वी होते, असा पती जन्मोजन्मी मिळावा, असे संजीवनी व्हट्टे म्हणाल्या. त्यांनी ‘एलएलबी’चीही पदवी घेतली असून, आता त्या पीएच.डी. करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com