कोरोनाची तमा न बाळगता "जय हिंद'चे अविरत कार्य ! 16500 भुकेल्यांना केले अन्नवाटप

कोविडच्या संकट काळात न घाबरता जय हिंद फूड भुकेल्या लोकांपर्यंत अन्न पोचवत आहे
Jai Hind Food Bank
Jai Hind Food BankCanva

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) तालुक्‍यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची स्थिती मागील दोन महिन्यांपासून हळूहळू वाढत आहे. लोकांच्या हातचे काम गेल्याने अन्नछत्र मंडळाकडून (Akkalkot Annachhatra Mandal) जेवण देण्यात येत आहे. ते जेवण असल्या तीव्र संकट काळात सुद्धा न घाबरता आणि न डगमगता शहरातील सर्वच भागात पोचवण्याचे काम जय हिंद फूड बॅंक (Jai Hind Food Bank) करीत आहे. या फूड बॅंकेचे जवळपास पंधरापेक्षा जास्त युवक स्वतः बाधित होऊ किंवा आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला धोका उद्भवू शकतो, याचा जराही विचार न करता दररोज दुपारी बारा ते चार या वेळेत जेवण वाटण्याचे काम करीत आहेत. आजपर्यंत 22 दिवसांत 16 हजार 500 लोकांना अन्न वाटप करण्यात आले आहे. (Jai Hind Food is delivering food to the hungry without fear during the crisis of Covid)

Jai Hind Food Bank
जिल्ह्यातील कोव्हिड सेंटर्सची होणार आता अचानक तपासणी !

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, सचिव श्‍यामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण अक्कलकोट शहरात गोरगरीब, गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. अक्कलकोट शहरातील डबरे गल्ली, माळी गल्ली, एसटी स्टॅंड परिसर, वडार गल्ली, गोवल वस्ती, मोरे वस्ती, ढाले वस्ती, शक्तीदेवी कट्टाजवळ, संजयनगर, नवश्‍या गणपती मंदिर परिसर यासह अन्य भागातील गरजूंना अन्न वाटप करण्यात येत आहे.

Jai Hind Food Bank
पाकिस्तानबरोबरच्या दोन युद्धात सहभागी 89 वर्षीय योद्‌ध्याने जिंकली आता कोरोनाविरुद्धचीही लढाई !

सोमवारी सलग बावीसाव्या दिवशी एक हजार भुकेल्यांना भात, आमटी, शिरा आदी अन्न वाटप करण्यात आले. आजपर्यंत 22 दिवसांत 16 हजार 500 लोकांना अन्न वाटप करण्यात आले असल्याने अडचणीच्या काळात आर्थिक दुर्बलांची चांगली सोय होत आहे. जय हिंद फूड बॅंकेचे सदस्य दररोज अन्नछत्रच्या गाडीत अन्न घेऊन येतात आणि मास्क, सॅनिटायझर व योग्य अंतर राखत लोकांना रांगेत उभे करून आवश्‍यक असलेल्या भागात जाऊन अन्नदान सेवा बजावीत आहेत. या उपक्रमामुळे अन्नछत्र मंडळ व जय हिंद फूड बॅंक यांची सेवा अधोरेखित व उपयुक्त सिद्ध होत आहे.

यासाठी अक्कलकोट अध्यक्ष अंकुश चौगुले, सतीश तमशेट्टी, शुभम बल्ला, योगेश पवार, महेश लिंबोळे, सुधीर तमशेट्टी, विनय गांगजी, बसवराज झुंजार, पंडित हत्तर्गी, आकाश चौगुले, ओंकार कांबळे, अमित कोळी, अतिश पवार, दयानंद नडगिरे, हिरा बंदपट्टे, आकाश चौगुले, विनायक मंजुळे, बंटी मडिखांबे, प्रताप यादव, महेश भोसले, अशोक जाधव, नारायण वाघमोडे तसेच शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार परिश्रम घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com