मंगळवेढा : महिला बचत गटातून एकीच्या बळावर दर्जेदार उत्पादन

मरवडेचा बचत गट पॅटर्न संपूर्ण राज्यभर असेल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे
 women's self-help groups
women's self-help groupssakal

मंगळवेढा : महिला बचत गटातून एकीच्या बळावरती तयार करण्यात येणारे उत्पादन दर्जेदार असून याला सोलापूर जिल्हा मर्यादित न ठेवता राज्यपातळीवर, देशपातळीवर मार्केटिंग मिळावे, चांगला भाव मिळावा, ऑनलाईन मागणी व्हावी, यासाठी उत्तम असे पॅकिंग करावे,तरच मरवडेचा बचत गट पॅटर्न संपूर्ण राज्यभर असेल असा विश्वास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी व्यक्त केला.

 women's self-help groups
दिव्यांगाचा निधी मार्चपूर्वी खर्च करा; अन्यथा खुर्ची कार्यालयाबाहेर

आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त रुक्मिणी सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मंगळवेढा, अंतर्गत समक्ष महिला प्रभाग संघ मरवडे, यांच्यासह मरवडे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आज लतीफभाई तांबोळी मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय रुक्मिणी जत्रेत ते बोलत होते.यावेळी जि.प.सदस्या शीला शिवशरण, सभापती प्रेरणा मासाळ, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सुधाकर मासाळ, सरपंच सुमन गणपाटील, सोमय्या तांबोळी,जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ पुनम दुधाळ, उपसरपंच रेश्मा शिवशरण यांच्यासह महिला उपस्थित होत्या.यावेळी बोलताना धोत्रे म्हणाले की, जिल्ह्यातील बचत गटाच्या माध्यमातून अनेक कुटुंबात या कर्तबगार महिला नावारुपाला आल्या,स्वयंरोजगारातूनमहिला स्वावलंबी झाल्याने भविष्यात महिला कुठेच कमी पडणार नाहीत, ही बाब अभिमानाची असल्याचे म्हणाले तालुक्यातील स्वयंसहाय्यता समुह निर्मिती विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री चे स्टॉल उभारण्यात आले.

 women's self-help groups
इतर मागासवर्गीय व भटक्या, विमुक्त जातीसाठीचे पंढरपुरात वसतीगृह करण्याचा आ.आवताडेचा प्रश्न

कार्यक्रमासाठी तालुका अभियान व्यवस्थापक उमेद रवींद्र भोसले, विलास दुपारगुडे, लिंगराज शरणार्थी,उमेश डांगे, सारंग पारडे, निर्मला पडवळे, साधना जाधव, वंदना जाधव, रेश्मा बटवेगार,कुमोदिनी चव्हाण, सुवर्णा मस्के, सुचिता मलगोंडे, सीमा घुले, सुजाता गणपाटील, उज्वला पोतदार, नम्रता काटकर, अंजली माने, मोनाली कुरवडे, स्वप्नाली भगत, रेश्मा मुलाणी, दीपाली गोडसे आदींनी प्रयत्न केले.या रुक्मिणी जत्रेत तालुक्यातील स्वयंसहाय्यता समुह निर्मित विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे 37 समूहांने स्टॉल लावले एका दिवसात 1 लाख 13 हजाराची उलाढाल झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com