सोलापूर : ३५० कोटी कर थकबाकीपैकी २८४ कोटींचा बुडीत आकडा

वॉटर ऑडिट, रिव्हिजनमधून होणार खात्री; थकबाकी वसुलीचे आव्हान
Rs 350 crore tax arrears Rs 284 crore debt solapur challenge of recovery arrears
Rs 350 crore tax arrears Rs 284 crore debt solapur challenge of recovery arrearssakal

सोलापूर : शहरातील मिळकतींच्या करावरच शहराची मदार आहे. मागील ३९८ कोटींच्या एकूण थकबाकीपोटी ४० कोटी रुपयांची करवसुली झाली आहे. मात्र उर्वरित ३५८ कोटींपैकी नळ, दंडाची रक्कम, खुल्या जागांची दुबार नोंदीची थकबाकी अशी २८४ कोटी रुपये वसूल न होणारी आहे. वॉटर ऑडिट, रिव्हिजनमधून मूळ थकबाकीचा आकडा स्पष्ट होणार आहे. महापालिका शहरातील नव्या मिळकतींचा शोध घेऊन महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना कर आकारणीमध्ये संपूर्ण शहरात एकसूत्रीपणा असावा यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे.

जीआयएस सर्व्हेतून केवळ १६ हजार नव्या मिळकती आढळल्या. त्यानंतर महावितरणच्या माध्यमातून शहरातील मिळकतींचा डाटा मागवून घरगुती व व्यावसायिक मिळकतींची उलट तपासणी झाली. कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमून शहराचे वॉटर ऑडिट सुरू केले. या ऑडिटमध्ये एबीडी एरियात साधारण दोन हजार तर इतरत्र एक हजार ७०० बोगस नळ आढळून आले. त्याचबरोबर गेल्या वीस वर्षांपासून शहराचे रिव्हिजन न झाल्याने वाढीव बांधकाम अथवा बदल केलेल्या बांधकामानुसार घराला कर आकरणी झाली नाही. नव्याने आरसीसी इमारत उभी राहिली तरी त्या मिळकतीला ज्युन्या मातीच्या घराची कर आकारणी आजतागायत कायम आहे. अशा सर्व मिळकतींच्या रिव्हिजनचे कामदेखील महापालिकेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत कर आकारणी विभागाने नवीन नियमानुसार केलेल्या अद्ययावत यादीनुसार नळांची संख्यादेखील अधिक असल्याचे दिसून आले.

तर खुल्या जागांचे मालक बदलल्यानंतर त्या-त्या पद्धतीने सुधारित आकरणी न होता जुन्यासह नव्या मिळकत क्रमांकानुसार आकरणी सुरू असल्याने थकबाकीदारांचा आकडा फुगला आहे. नळ एक परंतु मालक आणि भाडेकरू अशा दोन नावांनी होत असलेल्या आकारणीमुळे नळांची थकबाकीही यामध्ये मोठी आहे. तसेच मिळकत कर न भरलेल्या दंडाची रक्कमदेखील १६५ कोटी इतकी आहे. त्यामुळे एकूणच उर्वरित ३५८ कोटी थकबाकी करातील २८४ कोटी रुपये हे वसूल न होणारीच रक्कम असून, शहराचे वॉटर ऑडिट, रिव्हिजन पूर्ण झाल्यानंतर याची स्पष्टता होणार आहे.

आकडे बोलतात

  • एकूण मिळकती : २ लाख ४१ हजार

  • एकूण खुल्या मिळकती : ६५ हजार

  • एकूण नळांची संख्या : १ लाख १५ हजार

  • बोगस नळांची संख्या : ३ हजार ७००

वसूल न होणारा थकीत आकडा

  • पैकी नळ : ५४ कोटी

  • खुल्या जागा : ६५ कोटी

  • दंडात्मक रक्कम : १६५ कोटी

  • एकूण : २८४ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com