सोलापूर : मोबाईल, टीव्ही विसरा; मैदानात उतरा!

उन्हाळी सुट्टीत खेळ, छंदवर्ग व गोष्टींच्या पुस्तकांशी करा दोस्ती
Walking
WalkingSakal

सोलापूर - कोरोनात विस्कळित अभ्यास व जीवनशैलीला सामोरे जाणाऱ्या मुलांसाठी कोरोनामुक्तीनंतर येणारी ही पहिली उन्हाळी सुट्टी मुक्त आनंद देणारी, गोष्टींची पुस्तके वाचनाची व संवादी व्यक्तिमत्त्व घडवणारी असावी, अशीच भूमिका सर्वच क्षेत्रांतून पुढे आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत आभासी शिक्षणाने मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास खुंटला. खेळणे, वाचन, लेखन कमी झाले. त्यांच्या सामाजिक जाणिवा कमी झाल्या. मुक्त खेळण्यावर मर्यादा आल्या. मोबाईल वापराचे दुष्परिणाम उमटले. या पार्श्वभूमीवर याच आठवड्यात लागणारी उन्हाळी सुट्टी कोरोनाच्या धास्तीतून मुक्त करणारी व संकुचित झालेले व्यक्तिमत्त्व फुलवण्याची संधी देणारी असणार आहे. तसेच वाचन व लेखनाचा सराव पुन्हा सुरळीत करण्याची संधी या सुट्टीतून मिळणार आहे.

अशी घालवावी उन्हाळी सुट्टी

  • मुलांसाठी वाचनालये लावावीत

  • मुले संवादी बनण्यासाठी छंद, क्रीडा, कला शिबिरे उपलब्ध करून द्यावीत

  • मैदानावर भरपूर खेळू द्यावे व मुक्तपणे हुंदडू द्यावे

  • मोबाईल, टीव्ही व संगणकापासून मुलांना दूर ठेवावे

  • शिक्षकांनी मागे पडलेल्या अभ्यासासाठी स्वाध्याय द्यावेत.

  • मोबाईल टीव्ही सोडून मुलांसोबत गप्पा व सहली कराव्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com