सोळा लाखांचे दागिने घेऊन कारागीर पसार

तीन सराफांची जोडभावी पोलिसांत धाव
jewelery stolen.
jewelery stolen.sakal

सोलापूर: येथील पूर्व मंगळवार पेठेतील सर्फराज सल्लाउद्दीन काझी (रा. काझीपाडा, पश्चिम बंगाल) याने सोलापुरातील तीन सराफांनी बनवायला टाकलेले दागिने घेऊन पळ काढला आहे. १६ लाख ३२ हजारांची फसवणूक केल्याची फिर्याद असिफ बशीर शेख (रा. हाजी हजरत खान चाळ जवळ) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली.

घटनेची हकीकत अशी, फिर्यादी असिफ यांचे सिद्धेश्वर पेठेतील मक्का मशिदीशेजारी अरमान ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २०१८ पासून ते पूर्व मंगळवार पेठेतील बाबा कॉम्प्लेक्समधील सर्फराजकडून दागिने बनवून घेत होते. २९ एप्रिलला फिर्यादी हे मेव्हण्यासह सर्फराजकडे गेले आणि त्यांनी ७० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे नेकलेस तयार करण्याची ऑर्डर दिली. २ मे रोजी पुन्हा तेवढीच ऑर्डर दिली. तसेच ५० ग्रॅम सोन्याच्या मणी तयार करण्याचीही ऑर्डर दिली. त्यासाठी २४ कॅरेट सोने त्याला दिले.

१२ मे रोजी ते दागिने आणायला गेले तर सर्फराजच्या दुकानाला कुलूप होते. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली, त्यावेळी सर्फराज हा ११ मेपासून नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, त्यांनी त्याच परिसरातील सराफ जसीमुद्दीन सुराबुद्दीन मल्लिक यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी २८ एप्रिलला त्यांनी सर्फराजकडे ४२ ग्रॅम व ३० एप्रिल रोजी सहा ग्रॅमचे दागिने बनविण्याची ऑर्डर दिल्याचे समजले. तसेच सोपान अशोक महिंद्रकर यांचेही ५७ ग्रॅम दागिने घेऊन सर्फराज पसार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर असिफ यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते हे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com