सोलापुर : "लक्झरी व बोलेरो अपघातात दोघांचा मृत्यु"

अपघातात नवरी सोडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला
अपघातात
अपघातात sakal

मोहोळ : मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गावर मोहोळ च्या दिशेने राँग साईड ने भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बस ने बोलेरो जीपला धडक देऊन झालेल्या अपघातात नवरी सोडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सारोळे फाटा (ता. मोहोळ) येथे ता 22 एप्रिल रोजी पहाटे एक वाजता घडली. या अपघातात अरूण भानुदास केंगार वय 35,रा पळशी व सुरेश बबन भोसले वय 30 रा सुपली ता पंढरपुर अशी मृतांची नावे आहेत.

या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पळशी (ता. पंढरपूर) येथील अरुण भानदास केंगार व सुपली येथील सुरेश बबन भोसले या दोघांनी सुपली गावातीलच बाळू वाघमारे यांची बोलेरो जीप क्रमांक एम एच 13 ए झेड 3869 ही घेऊन सोलापूर येथे नवरी सोडण्यासाठी गेले होते. या दोघांनी सोलापूर येथील हळदीचा कार्यक्रम उरकुन सोलापूर येथून रात्री बारा वाजता सुपली कडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान शुक्रवार ता 22 एप्रिल रोजी पहाटे एक वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने सारोळे (ता. मोहोळ) येथील लादे वस्ती जवळ आली असता समोरून रॉंग साईडने भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बस क्रमांक ए आर 06 ए 8417 ने बोलेरोला जोराची धडक दिली. त्यात दोघांच्या हाता, पायाला व डोक्यास मार लागून गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले.

या भिषण अपघातामध्ये बोलेरो गाडीचा जागीच चक्काचूर झाला असून लक्झरी बस चे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची खबर न देता लक्झरी बसचा चालक वाहन सोडून पळून गेला असल्याची फिर्याद नवनाथ भानदास केंगार रा. पळसी (ता. पंढरपूर) यांनी दिली असून पोलिसांनी लक्झरी बसच्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे व सहाय्यक फौजदार ज्योतिबा पवार हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com