सोलापूर
सोलापूरsakal

सोलापूर : ‘वायुवेग’द्वारे साडेचार हजार वाहनधारकांवर कारवाई

‘आरटीओ’कडून ५.८० कोटींचा दंड वसूल; शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती

सोलापूर : सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दोन वायुवेग पथकांद्वारे २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात जवळपास चार हजार ४९७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून आरटीओने जवळपास पाच कोटी ८० लाख ७१ हजार १५८ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

वायुवेग पथकाद्वारे एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षात सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने शहर- जिल्ह्यामध्ये पाच कोटी ८० लाख ७१ हजार १५८ रुपयांचा दंड वसूल केला आहे. वायुवेगकडून साडेचार हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारक व चालकांकडून विविध गुन्ह्यांतर्गत दंड वसूल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय २०२१-२२ या आर्थिक वर्षात पाच कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली करून विभागात आपले स्थान कायम ठेवले आहे. सर्वांत जास्त दंड मालवाहतूक वाहनांकडून वसूल करण्यात आला.

क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करणाऱ्या म्हणजेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांनाही दंड आकारण्यात आला आहे. तसेच चालकांकडे वाहन परवाना नसल्यामुळे देखील दंड आकारण्यात आला आहे. पीयूसी, विमा आदी प्रकारची कारवाई करीत हा दंड आकारून दोन्ही पथकांकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय हेल्मेट नसणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सीटबेल्ट न वापरणे यांच्यावरसुद्धा कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी तसेच अधिकारी यांनी परिश्रम घेतले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अशी करण्यात आली कारवाई महिना वाहने दंड

एप्रिल ३८९ ४३२९६००

मे १७१ ३७०८७००

जून १४९ ४१६०५५९

जुलै ६८० ४५०९०४५

ऑगस्ट ६८० ४६१८१६०

सप्टेंबर ५३० ४८१४६१६

ऑक्टोबर ४५१ ४९५३०६४

नोव्हेंबर ४९४ ४७६०१०६

डिसेंबर ६५२ ६००४७४३

जानेवारी ३२६ ५०९०६४२

फेब्रुवारी ३६२ ५६२१८३९

मार्च २१३ ५५०००८४

एकूण ४४९७ ५८०७११५८

सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वायुवेगमधील दोन्ही पथकांनी चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.

- अमरसिंह गवारे,

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com