कापूस निर्यात धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फटका !

कापूस निर्यात धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फटका! मागणी-पुरवठ्याचे बिघडले गणित
कापूस निर्यात धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फटका !
कापूस निर्यात धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फटका !Canva
Summary

केंद्र सरकारच्या कापूस निर्यात धोरणामुळे सूताच्या मागणी- पुरवठ्याचे गणित बिघडले आहे.

सोलापूर : केंद्र सरकारच्या कापूस निर्यात धोरणामुळे (Cotton export policy) सूताच्या (Cotton) मागणी- पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. परिणामी प्युअर कॉटन सूत दरात मोठी वाढ झाल्याने देशातील वस्त्रोद्योगाला (Textile Industry) फटका बसत आहे. सूत दर वधारल्याने सोलापुरी चादर (Solapur Chaddar) - टॉवेलच्या दरात 15 रुपयांची दरवाढ करावी लागली आहे. (The textile industry is suffering due to the cotton export policy-ssd73)

कापूस निर्यात धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फटका !
कॉंग्रेसमधलं बंड !

शहरात यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी सोलापुरात शंभर टक्के सूतापासून (प्युअर कॉटन) टॉवेल - चादरीचे उत्पादन घेतले जात असे. पण सूत, कलर- केमिकल आदी दरांमध्ये वाढ होत असल्याने त्याचा फटका यंत्रमागधारकांना बसत आहे. कच्च्या मालाच्या तुलनेत पक्‍क्‍या मालाला भाव वाढवून मिळत नसल्याने यंत्रमागधारकांनी गत दहा - बारा वर्षांपासून सिंथेटिक यार्नचा (प्युअर - कृत्रिम मिश्रण असलेले सूत) वापर सुरू केला आहे. या सूताचा वापर करून यंत्रमागधारकांनी कॉस्टचे गणित जुळवले आहे. या पार्श्वभूमीवरदेखील शहरात काही यंत्रमागधारक प्युअर कॉटनपासून उत्पादने घेत आहेत, मात्र या कॉटनच्या दरात चार - पाच महिन्यांपूर्वी वाढ झाल्याने कॉस्टचे गणित जुळत नव्हते. यावर पक्‍क्‍या मालाच्या दरवाढीवर विचार सुरू झाला. पण दर्जाच्या मुद्‌द्‌यावरून याबाबत एकमत होत नव्हते. अखेर यंत्रमागधारकांनी पक्‍क्‍या मालाच्या दरात प्रतिकिलो 15 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कापूस निर्यात धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फटका !
पंढरपूर, माळशिरसमध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी !

केंद्र सरकारच्या (Central Government) कापूस निर्यातपूरक धोरणामुळे देशात कापूस पर्यायाने सूताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ होत आहे. कच्च्या मालाऐवजी केंद्राने पक्‍क्‍या मालाच्या उत्पादनांना निर्यातसंदर्भात प्रोत्साहन द्यावे, अशी वस्त्रोद्योजकांची मागणी आहे. यासंदर्भात जिल्हा यंत्रमागधारक संघातर्फे खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्युअर कॉटनचा दर 230 रुपये

पाच महिन्यांपूर्वी प्युअर कॉटनचा दर प्रतिकिलो 190 रुपये होता, तो दर आता 220 ते 230 रुपयांवर गेला आहे. या दरवाढीचा परिणाम टेक्‍स्टाईल उत्पादनांच्या कॉस्टवर झाला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव प्युअर कॉटनने बनणाऱ्या चादर - टॉवेलच्या दरात 15 टक्‍क्‍यांची वाढ करावी लागली आहे. दुसरीकडे, सिंथेटिक यार्नच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com