सांगली जिल्ह्यात यंदाचे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

सोलापूर - नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ नाका (ता. वाळवा, जिल्हा सांगली) येथे 42 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. 5 ते 8 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात राज्यभरातून विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोग साहित्यासह 4 एप्रिलपर्यंत प्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात निवड झालेल्या शाळेतील शिक्षकांनी विस्तार अधिकारी अशोक भांजे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी केले आहे.
Web Title: state lavel science exhibition in sangli district