राज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू 

राज्यातील प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरू 

सातारा -  प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून तातडीने भरती करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्त्व लागू करावे, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून, आज येथील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी आपापल्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले. 

गेली अनेक वर्षे प्राध्यापकांची भरती केली गेलेली नाही. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांतून प्राध्यापकांची संख्या कमी आहे. तात्पुरते प्राध्यापक भरले जातात. अर्थातच प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी सर्व प्राध्यापकांची मागणी आहे. तसेच सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, युजीसीच्या नियमानुसार प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढवावे, संचालक आणि सहसंचालक उच्चशिक्षण कार्यालयातील मनमानी कारभाराला आळा घालावा, अशा शिवाजी युनिव्हर्सिटी प्राध्यापक ऑर्गनायझेशनच्या मागण्या आहेत. यासाठी आजपासून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आज दुपारी 12 वाजता सर्व प्राध्यापक आपापल्या महाविद्यालयांच्या प्रवेश द्वारात जमले. त्यांनी धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com