मोहोळमध्ये स्टील लेटरबीन बसवेिणार

राजकुमार शहा
गुरुवार, 24 मे 2018

मोहोळ : 'स्वच्छ मोहोळ, सुंदर मोहोळ' ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी मोहोळ नगरपरिषदेने शहरातील प्रत्येक चौकात मुंबईच्या धर्तीवर नवीन प्रकारचे स्टील लेटरबीन बसविण्यास चालु केले असुन शहरातील मुख्य रस्त्यावर पुरुषासाठी वीस तर माहिलासाठी दहा प्लॅस्टीक  स्वच्छता गृह उभारण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली 

नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरवासीयांना वेगवेगळ्या सुविधा देऊन 'स्मार्ट' मोहोळची संकल्पना राबविण्याचे आश्वासन दिले होते त्या धर्तीवर अनेक विकास काम झाली आहेत तर काही सुरू आहेत. शहरातील अनेक व्यापारी व व्यावसायीक दुकानची स्वच्छता केल्यानंतर निघणारा कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे सर्वसामान्याना त्याची अडचण होते  आणि घाणीचे साम्राज्य पसरते चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ शहरात मुख्य रस्त्यावर एकही स्वछता गृह नाही. तसेच त्यांची ही दुरावस्था झाली आहे. म्हणुनत वीस पुरुषासाठी तर दहा माहिलासाठी प्लॅस्टीक स्वच्छता बसविण्यात येणार आहेत. लेटरबीन ही स्टीलची व चांगल्या दर्जाची असल्याचे बारसकर यांनी सांगितले यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या लेटरबीन मधील कचरा दररोज नगर परिषद घेऊन जाणार आहे. 

आपण खाजगी कामासाठी गेल्या महिन्यात  मुंबईला गेलो होतो त्यावेळी एका चौकात हे  लेटरबीन पाहिले व आपल्याही शहरात असा प्रयोग करावा असे ठरविले व ती संकल्पना आज प्रत्यक्षात आणली 

- रमेश बारसकर, नगराध्यक्ष मोहोळ 

Web Title: a steel letterben will be installed in the mohol