चोरलेल्या जेसीबीने आरगमध्ये फोडले एटीएम

२७ लाखांची रक्कम चोरण्यास अयशस्वी
चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे एटीएम जेसीबीने फोडले.
चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे एटीएम जेसीबीने फोडले.Sakal

आरग (ता. मिरज) - येथे चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरीच्या जेसीबीने फोडले. जेसीबीच्या सहाय्याने एटीएम मशिनचे जागीच तुकडे केले. परंतु, एटीएममधील २७ लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांना चोरी करता आली नाही. त्यामुळे चोरट्यांनी ५० मीटर अंतरावरील एका चौकात एटीएम मशिन नेऊन फेकले व जेसीबीसह पसार झाले. ही घटना आज मध्यरात्री उघडकीस आली. मिरज ग्रामीण पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील एका पेट्रोलपंपावर उभा असणारा जेसीबी चोरट्यांनी आज मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास चोरला. ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असणाऱ्या ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केला. जेसीबीच्या सहाय्याने एटीएम मशिन तळातूनच उचकटून बाहेर काढला. जेसीबीने एटीएम मशिनचे जागीच तीन तुकडे केले व ते उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु, चोरट्यांनी ५० मीटर अंतरावर असणाऱ्या एका चौकात एटीएम मशिन आणून टाकले. आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेता चोरट्यांनी जेसीबी घेऊनच पळ काढला. ग्रामस्थांनी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झाले. चोरी केलेले एटीएम मशिन दुसऱ्या जेसीबीच्या सहाय्याने उचलून एटीएम सेंटरमध्ये ठेवले. दरम्यान, आरग-लक्ष्मीवाडी रस्त्यावर चोरी केलेला जेसीबी सकाळच्या सुमारास आढळून आला. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, मिरज ग्रामीणचे निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी भेट दिली. चोरीचा पंचनामा केला. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. एटीएममधील रोख रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्यांचा तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com