कुत्र्याला धडक बसल्याने रिक्षा पलटली; विद्यार्थी जागीच ठार

जगन्नाथ माळी
बुधवार, 25 एप्रिल 2018

उंडाळे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : माकडाचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्याला जोराची धडक बसल्याने प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा पलटी झाली. त्यात दहावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला.

सुजित संभाजी वीर (वय १४, रा. तुळसण, ता. कऱ्हाड) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. उंडाळे येथील शिवतेज ढाबा येथे सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

सुजित वीर दहावीच्या जादा तासासाठी निघाला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. तो ओंड येथील पंडीत गोविंद वल्लभ विद्यालयात शिकतो आहे.

उंडाळेहून कऱ्हाडकडे निघालेल्या प्रवासी रिक्षा (एम.एच. ११-एजे-०२८९) मधून सुजित निघाला होता. ढाब्याजवळ येताच झाडावरून एका माकडाने रस्त्यावर उडी मारली. त्याच्या मागे कुत्रा लागला. अचानक झालेल्या प्रकाराने रिक्षा चालकही गोंधळून गेला.

त्यांना चुकवण्याच्या प्रयत्ना त्याने कुत्र्याला जोराची धडक दिली. त्यावेळी रिक्षा पलटली. त्यात सुजित जागीच ठार झाला. अन्य पाच प्रवासी जखमी आहेत.

स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्यांना उपचारास दाखल केले आहे. या अपघातामुळे कऱ्हाड ते चांदोली रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: Student lost his life in an accident near Undale in Satara