एसटी वेळेत येत नसल्याने इस्लामपूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आंदोलन

एसटी वेळेत येत नसल्याने इस्लामपूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आंदोलन

सांगली - वेळेत एसटी पोहचत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ आज इस्लामपूरमध्ये विद्यार्थ्यांना आंदोलन केले आहे. इस्लामपूर बस स्थानकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत बस वाहतूक ठप्प केली.

इस्लामपूर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर असणाऱ्या नेर्ले या राष्ट्रीय महामार्गावरील गावातील महाविद्यालयीन युवतींनी वेळेत एसटी उपलब्ध होत नसल्याने शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे संतप्त महाविद्यालय विद्यार्थ्यांनी इस्लामपूर एस टी डेपोत आंदोलन केले. यावेळी बस स्थानकात सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

युवतींच्या आक्रमक रुद्रावताराने बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले. बसचे वाहक यांचे संवाद व्यवस्थित नसतात. याबाबत तक्रारीचा पाढा वाचला. यानंतर एसटी प्रशासनाने उद्यापासून सकाळी साडेसात वाजता बस सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com