सोलापुरात काँग्रेसच्या उपोषणाला सहकारमंत्र्यांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी काँग्रेसच्या वतीनं आज देशभर एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे. सोलापूरातही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथे एकदिवसीय उपोषण सुरू होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख सोलापूर श्रमिक पत्रकार संघात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते.

सोलापूर : सोलापूरात आज (सोमवार) एक अनपेक्षित धक्का कार्यकर्त्यांना आणि सोलापूरकरांना मिळाला. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या उपोषणाला चक्क राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भेट दिली.

सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी काँग्रेसच्या वतीनं आज देशभर एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे. सोलापूरातही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथे एकदिवसीय उपोषण सुरू होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख सोलापूर श्रमिक पत्रकार संघात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. काँग्रेसचे उपोषण सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या शेजारीच असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला वाटलं तुम्ही आमच्याकडे आलात, असे म्हणताच मी तुमच्याकडेही येतो असे म्हणत सहकार मंत्री सुभाष देशमुख थेट व्यासपीठावर गेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली.

सुभाष देशमुख यांनी मोठे मन दाखवत घेतलेल्या भेटीबद्दल सुशीलकुमार शिंदेंनी त्यांचे दिलखुलासपणे हसत मुखाने स्वागत केले. ही भेट अनपेक्षितपणे घडलेली असली तरी या घटनेने सध्या सोलापूरात चांगलीच चर्चा रंगली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तसेच देशाच्या कृषी खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या शरद पवारांनी रुजवलेल्या सुसंस्कृत राजकारणाची झलक आज खऱ्या अर्थाने सोलापूरात पहायला मिळाली.

Web Title: Subhash Deshmukh meet Sushilkumar Shinde in Solapur