डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांचे हवे सहकार्य - अधीक्षक शर्मा

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांचे हवे सहकार्य - अधीक्षक शर्मा

सांगली - डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणेने यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. मंडळांनी सहकार्य करावे, आवाहन करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुन्हेगारी रोखण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केले आहे. 

गतवर्षी पोलिसांनी "डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवार' संकल्पना मांडली. जिल्ह्यात दोन बंधारे बांधण्यात आले. यंदाही डॉल्बीचे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवात जमणारे पैसे विधायक कामांसाठी खर्च करा, असे आवाहन मंडळांना केले आहे. 

श्री. शर्मा म्हणाले,""शहर सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे. शहरात बसवलेल्या 80 सीसीटीव्हींच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आलेत. संवेदनशील भागांसह उपनगरातही आणखी 120 सीसीटीव्हींची गरज आहे. त्यासाठी मंडळांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुन्हेगारी रोखण्याच्या प्रयत्ना हातभार लागेल. मंडळांबरोबरच सामाजिक संघटनांनीही पुढाकार घ्यावा.'' 

साडेतीन लाखांचा दंड 
शहरातील मुख्य रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून साडेतीन लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. सीसीटीव्हींसाठी सुमारे पन्नास लाखांचा खर्च झाला आहे. आणखी 120 सीसीटीव्हींची गरज आहे. तसेच तपासकामी मदतीसाठी अत्याधुनिक यंत्रणाही बसवली जाणार असल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. 

मूर्तींचे स्टॉल सर्व्हिस रोडवर 
पुष्पराज चौक ते मिरज रस्त्यावर यापूर्वी गणेश मूर्तींचे स्टॉल लावले जात होते. मात्र, वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सर्व्हिस रोडवर स्टॉलवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चारचाकीसाठी इमॅन्युअल इंग्लिश स्कूलजवळ, तर दुचाकीसाठी सैनिक कल्याण कार्यालयाजवळ पार्किंग व्यवस्था असेल, असे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. 

वीस चौकींसाठी प्रयत्न 
शहरातील संवेदनशील भागांची यादी तयार करण्यात आली असून लवकरच वीस ठिकाणी चौकी उभारल्या जातील. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी चांगली जागाही असले, अशी माहिती अधीक्षक शर्मा यांनी दिली. 

दीडशेवर हद्दपार 
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. दीडशेवर जणांवर हद्दपारी करण्यात आली आहे. तसेच तडीपारीचे प्रस्तावांवर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच सोशल मीडियावरही पोलिसांची नजर असेल, असे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. 

गणेशोत्सवात वाहतूकीच्या मार्गात बदल 

गणेशोत्सव काळात सांगली-मिरजेत सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूकीच्या मार्गत बदल करण्यात आले आहे. नागरीकांना देखावे व विसर्जन मिरवणूक पाहता यावेत, यासाठी हे बदल पोलिस दलाकडून करण्यात आले आहेत. मिरवणूकीची वाहने, पोलिस वाहने, रूग्णवाहिका, अग्निशमन बंब शिवाय अन्य वाहनांना मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 131 नुसार शिक्षा किंवा दंडाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. 

वाहतूकीतील बदल असे 
इथे मनाई - सांगलीतील टिळक चौक, सराफ कट्टा, कापडपेठ, करमरकर चौक, स्टेशन चौक, जुना बुधगाव रस्ता, जामवाडी, कर्नाळ रस्ता, गवळी गल्ली, मगरमच्छ कॉलनी, अमराई रस्ता, पटेल चौक, मिरजेतील श्रीकांत चौक, स्टेशन चौक, हिरा हॉटेल, फुलारी कॉर्नर, बॉम्बे बेकरी, किसान चौक, दत्त चौक, जवाहर चौक, भोसले चौक, झारी मस्जिद कॉर्नर, याचबरोबर श्रीकांत चौक ते गणेश तलाव मार्गावर वाहतूकीस बंदी असेल. 

पर्यायी मार्ग - सांगलीतील पुष्पराज चौक-सिव्हिल हॉस्पिटल-झुलेलाल चौक-पत्रकार नगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर मार्गे कोल्हापूर रस्ता. तसेच इस्लामपूर टोलनाका-बायपास-पुष्पराज चौक, झुलेलेला चौक मार्गे कोल्हापूर रस्ता. तासगाव विटासाठी कॉलेज कार्नरमार्गे पुष्पराज चौकातून कोल्हापूर रस्ता मार्ग असेल. सोलापूरकडून येणाऱ्यांसाठी तासगाव फाटा-सुभाषनगर-विजयनगर मार्गे म्हैसाळ कागवाड मार्गे रस्ता. पंढरपुरहून येणाऱ्यांसाठी गांधी चौक, वंटमुरे कॉर्नर, विजयनगर, विश्रामबाग, धामणी, अंकली कोल्हापूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com