परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

बाळीवेस येथील जैन गुरुकुल शाळेमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. डोक्‍याला मार लागल्यानंतर तिला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोलापूर - बाळीवेस येथील जैन गुरुकुल शाळेमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. डोक्‍याला मार लागल्यानंतर तिला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार पेठेतील आदर्श हायस्कूल येथील एक विद्यार्थिनी दहावीचा इतिहास पेपर देण्यासाठी बाळीवेस येथील जैन गुरुकुल शाळेमध्ये आली होती. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिने वर्गातील शिक्षकाकडे बाहेर जाण्याची परवानगी मागितली. शिक्षकांनी परवानगी नाकारल्यानंतर या विद्यार्थिनीने वर्गाबाहेर जाऊन दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. शाळेमध्ये सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Web Title: Suicide attempt by a student in Solapur