तीस रुपयांसाठी मुलीची पेटवून घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

सातारा : शेजारच्या घरातून आणेलल्या 30 रुपयांवरून आई रागवेल, या भीतीने वर्णे (ता. सातारा) येथील 11 वर्षांच्या शाळकरी मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. 

सातारा : शेजारच्या घरातून आणेलल्या 30 रुपयांवरून आई रागवेल, या भीतीने वर्णे (ता. सातारा) येथील 11 वर्षांच्या शाळकरी मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. 

आरती विलास गायकवाड (वय 11) असे तिचे नाव आहे. वर्णे येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात ती शिकत होती. काल (ता. 13) सायंकाळी तिने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यामध्ये ती 100 टक्के भाजली होती. उपचारासाठी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांच्या घरातून न सांगता पैसे घेतल्याने तिच्यावर ही वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोणालाही न सांगता आरतीने शेजारच्या घरातून 30 रुपये घेतले होते. पैसे सापडत नसल्याने शेजाऱ्यांची शोधाशोध सुरू झाली. ही माहिती आरतीला समजली. त्यानंतर घाबरून तिने हा प्रकार तिच्या भावाला सांगितला. भावाने तिला पैसे परत करण्यास सांगितले. त्यानुसार तिने पैसे परतही केले. त्यानंतर भाऊ बाहेर निघून गेला. 

शेतात मजुरी करून सायंकाळी सहाच्या सुमारास आरतीची आई परत येणार होती. हा प्रकार समजल्यावर आई मारले, रागवेल, अशी भीती त्या चिमुरडीला वाटली. त्यामुळे सायंकाळी आई घरी येण्यापूर्वीच तिने पेटवून घेतले. या घटनेचा संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.