‘चिंध्यापीर’ चिंधीमुक्त करण्यावरून खोडसाळपणा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

इस्लामपूर - अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या येथील ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजसमोरील एक औषधी वनस्पती तथा ‘चिंध्यापीर’ आज चिंध्यांच्या जोखडातून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले. मात्र काहींनी खोडसाळपणा करत त्यावर  पुन्हा चिंध्या टाकल्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याला जशास तसे प्रत्युत्तर देत हे झाड पुन्हा चिंधीमुक्त केले.

अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य  विविध उपक्रमप्रमुख डॉ. नितीन शिंदे, प्राचार्य एस. बी. माने, शाखेचे अध्यक्ष विष्णू होनमोरे, पी. व्ही. गायकवाड, योगेश कुदळे, अवधूत कांबळे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. १७) पाचुंद्याचे झाड चिंधीमुक्त केले होते. अनेक वर्षे इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर आरआयटी कॉलेजसमोरील एक झाड लोकांकडून पुजले जात होते. कापडाच्या चिंध्या या झाडावर टाकून लोक आपली श्रद्धा व्यक्त करीत होते. त्या झाडावर कपडे टाकल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी समजूत असल्याने अनेक लोक या झाडावर चांगली चांगली कपडे टाकतात. याचा दुष्परिणाम  झाडावर होऊन त्याची वाढ खुंटली होती. त्याची यात्रादेखील भरवली जाते. अंनिसचे कार्यकर्ते आणि आरआयटी कॉलेजच्या विवेकवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी या झाडावरील चिंध्या काढून त्या जाळल्या. झाडाला पाणी घातले व आसपासचा परिसर स्वच्छ केला. त्याविरोधात उघडपणे न जाता काहींनी खोडसाळपणाने या झाडावर पुन्हा चिंध्या टाकल्या. पण विद्यार्थ्यांनी पुन्हा हे झाड चिंधीमुक्त केले. 

एक औषधी वनस्पती वर्षानुवर्षे पुजणे आणि त्याकडून अपेक्षा ठेवणे ही समजूत नष्ट करण्यासाठी आमचा सकारात्मक पुढाकार आहे. संबंधितांनी चिकित्सा करून मगच विरोध करावा.
-डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे, अंनिसचे कार्यकर्ते.

Web Title: superstition eradication issue islampur