akkalkoth
akkalkoth

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पालखी परिक्रमा पुनरागमनाचे स्वागत

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने काढण्यात आलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका परिक्रमा पालखी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून परत आज रविवारी तीर्थक्षेत्र अक्कलकोटला परत आली. या पालखी सोहळ्याचे स्वागत व पूजन खंडोबा मंदिर येथे वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे व उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या हस्ते पालखीचे स्वागत व पुजन करण्यात आले. 

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, सचिव शाम मोरे, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, रविंद्र भंडारे, अप्पा हंचाटे, पालखी परिक्रमेचे संयोजक संतोष भोसले, प्रकाश गायकवाड, सुरेश सुर्यवंशी  आदी उपस्थितीत होते. टाळ मृदुंगाचा गजर, सुश्राव्य व वाद्य वृंद, स्वामी नामाचा जयघोष याने आसमंत दुमदुमून गेला होता. मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने पालखी सोहळ्याचे स्वामीभक्तांनी स्वागत केले. या परिक्रमेचे भ्रमण सोलापूर जिल्ह्यातून प्रारंभ होऊन सांगली, कोल्हापूर मार्गे कनार्टकातील बेळगाव नंतर गोव्यातील शिवोली, बांदा, अरोंदाहून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, नांदेड, परभणी, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यात २१० दिवसात सुमारे १५ हजार किलो मीटर पालखी परिक्रमेचा प्रवास झाला. तर लाखो भाविक जे अक्कलकोट येथे येऊ शकत नाही अशा सर्वांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला. या पालखी परिक्रमेत सुमारे दोन हजार भाविक सहभाग नोंदविला होता.

या पालखी सोहळ्यात सिध्दाराम कल्याणी, श्रीकांत झिपरे, शशिकांत कडगंची, गणेश भोसले, वैभव मोरे, शुभम कामनूरकर, मनोज निकम, राजु नवले, संजय गोंडाळ, सागर गोंडाळ, सनी सोनटक्के, विजय पवार, महादेव अनगले, चेतन शिंदे, स्वामीानथ गुरव, शंकर सुरवसे, धनंजय माने, अमर पोतदार, आतिष पवार, सुरज निंबाळकर, बाळू पोळ, समर्थ घाटगे, प्रशांत कडबगांवकर, सिध्दप्पा पुजारी, शहाजी यादव, पिंटू धोडमनी, अनंत क्षीरसागर, संभा पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com