सांगली-मिरजेत २७-२८ मार्चला ‘स्वरमिलाप’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

सांगली - ऋतुचक्र बदलाचे संकेत देणारी चैत्र पालवी आता सर्वत्र फुलली आहे. मराठी वर्षारंभ म्हणजेच चैत्र गुढी पाडव्याची चाहूलही सर्वत्र लागली आहे. साडेतीन महूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्याच्या स्वागतासाठी यंदा ‘सकाळ’तर्फे सर्व वाचकांसाठी नववर्षाची भेट म्हणून नव्या उमेदीच्या कलावंतांची संगीत मैफल आयोजित केली आहे. 

पाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे २७ मार्चला सांगलीत, तर पाडव्यादिवशी २८ मार्चला सकाळी मिरजेत ही मैफल होईल. गायक अभिषेक तेलंग व रसिका गाणू यांच्या ‘पाडवा स्वरमिलाप’ या संगीत मैफलीचा आनंद रसिकांना लुटता येईल. 

सोमवारी (ता. २७) सायंकाळी साडेसात वाजता भावे नाट्यगृहात, तर मंगळवारी सकाळी सात वाजता बालगंधर्व नाट्यगृहात ही मैफल होईल. शास्त्रीय गायनासह भावगीत भक्तिगीतांची ही मैफल रसिकांसाठी नवचैतन्य देणारी ठरेल. गेल्या काही वर्षांत शास्त्रीय गायकीत रसिका गाणू व अभिषेक तेलंग यांनी आपला ठसा उमटवला आहे. देशभरातील अनेक प्रतिष्ठेच्या मैफलींमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यांच्या स्वराभिषेकांची मोहिनी जाणत्या रसिकांवर  पडली आहे. आघाडीच्या सर्व चित्रवाहिन्या,  आकाशवाणी तसेच मराठी चित्रपट गीतांमध्ये त्यांचा आवाज आता परिचयाचा झाला आहे.

मुख्य प्रायोजक हॉटेल रणवीर एक्‍झिक्युटिव्ह 
‘कमी शुल्क... सर्वोत्तम सेवा’ असं ब्रीद घेऊन कर्नाळ रस्त्यावर हॉटेल रणवीर एक्‍झिक्युटिव्हचा प्रारंभ होत  आहे. अल्पावधीत ते खवय्यांच्या पसंतीला उतरले आहे. पुण्या-मुंबईनंतर प्रथमच सांगलीत म्युझिक रूमची  वेगळी संकल्पना येथे साकारली आहे. मुंबई सोशल नावाने ही संकल्पना साकारली असून प्रत्येकाने अवश्‍य एकदा इथे भेट द्यायलाच हवी. ‘थ्री स्टार’च्या सुविधा सामान्य दरात देतानाच किंगसाईज व स्वीट लॉजिंग रुम्सची सोय देणारे हे सांगलीतील एक्‍झिक्युटिव्ह हॉटेल ठरले आहे. ट्राय कलर होंडा, आकाश इलेक्‍ट्रॉनिक्‍स, विजेता डेव्हलपर्स सहप्रायोजक आहेत.

Web Title: swarmilap programe in sangli miraj