निरीक्षकांची नेमणुक ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच-  सुजित झावरे

सनी सोनावळे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर - ग्रामपंचयातीच्या निवडणूकीमध्ये आपआपसांत तेढ होऊन वैमनस्य निर्माण होते व ते कायमस्वरूपी टिकुन राहते हे सर्व टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक  गावांमध्ये निरीक्षक नेमले आहेत. निरीक्षकांची नेमणुक ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच केली आहे असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झावरे यांनी स्पष्ट केले आहे.

पारनेर तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे  त्या पार्श्वभूमीवर झावरे यांनी आपली भुमिका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केली आहे.

पत्रकात म्हणले आहे की,ग्रामपंचायत निवडणुकीत गावात तेढ निर्माण होऊन गावाच्या विकासाला बाधक वातावरण तयार होते पक्षाचे निरीक्षक गावातील गटांना एकत्र बसवून एकोपा घडवुन आणत आहेत त्यांच्या मार्फत प्रत्येक गावात ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी याकरीता प्रयत्न करावेत असे आवाहन झावरे यांनी केले आहे.