स्वातंत्र्यलढ्यातील घटना आजही लढायला प्रेरणा देतात - गोपाळकृष्ण गांधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

ताकारी - स्वातंत्र्यलढ्यावेळी सशस्त्र लढ्यासाठी लागणारा पैसा उभारण्यास येडेमच्छिंद्र- शेणोली दरम्यानच्या गडखिंडीत ७४ वर्षांपूर्वी रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याची इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. ‘त्या’ लढ्याची जादू आजच्या समस्यांशी झगडण्याची प्रेरणा देते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विचारवंत गोपालकृष्ण गांधी यांनी केले.  कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील गडखिंडीत ७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी १६ सहकाऱ्यांसमवेत रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.

ताकारी - स्वातंत्र्यलढ्यावेळी सशस्त्र लढ्यासाठी लागणारा पैसा उभारण्यास येडेमच्छिंद्र- शेणोली दरम्यानच्या गडखिंडीत ७४ वर्षांपूर्वी रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याची इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. ‘त्या’ लढ्याची जादू आजच्या समस्यांशी झगडण्याची प्रेरणा देते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विचारवंत गोपालकृष्ण गांधी यांनी केले.  कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील गडखिंडीत ७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी १६ सहकाऱ्यांसमवेत रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता. या शौर्यशाली इतिहासाची नव्या पिढीला ओळख व्हावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या पुढाकाराने कार्यक्रम झाला.

श्री. गांधी म्हणाले,‘‘क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या परिवारासह स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भेटता आले हे माझे भाग्यच.’’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणाले,‘‘सात जून हा इतिहासात ऐतिहासिक म्हणून नोंद आहे. रेल्वे लूट ही ऐतिहासिक घटना आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक वीर आता हयात नाहीत. जे थोडे शिल्लक आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे कर्तव्य आहे.’’

ज्येष्ठ विचारवंत अशोक ढवळे यांनी प्रास्ताविक केले. ‘क्रांती’ दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांनी आभार मानले. क्रांतिसिंहाच्या कन्या श्रीमती हौसाताई पाटील, नातू ॲड. सुभाष पाटील, पुतणे बाबूराव पाटील, ‘क्रांती’ चे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, ‘हुतात्मा’ चे अध्यक्ष वैभव नायकवडी, स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन रामचंद्र लाड, ‘कृष्णा’ चे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, व्ही. वाय. पाटील, राजारामबापू बॅंकेचे संचालक संग्राम पाटील, पं. स. सभापती सचिन हुलवान, ॲड. रामराव मोहिते, शरद नांगरे, शंभूराजे पवार, पंडित माळी, मधुकर डिसले, वसंतराव पाटील, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, बबनराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.