ताकारीच्या कालव्यात सोमवारी पाणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

वांगी : ताकारी उपसा योजनेच्या पाण्याकडे मागील दोन महिन्यांपासून डोळे लावून बसलेल्या लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गाची मागणी मान्य झाली असून योजनेची वीज शनिवारी (ता.26) सकाळी जोडण्यात आली.

साटपेवाडी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आले असून उद्या (ता.27) दुपारपर्यंत टप्पा 1 वरील पंप सुरू केले जातील त्यानंतर मध्यरात्री टप्पा 2 वरील पंप सुरू करून सोमवारी सकाळी पाणी प्रत्यक्ष मुख्य कालव्यात सोडले जाईल. अशी माहिती योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी दिली. 

दरवर्षी आक्‍टोबरला सुरू होणारी ताकारी योजना दोन महिने लांबल्याने लाभक्षेत्रातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्रच पाण्याचा खडाखडाट झाल्याने वर्षभर जपलेली हिरवीगार पिके करपली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणीपट्टी गतवर्षीच्या ऊसबिलातून देऊनही पिके वाळविल्याने पाटबंधारे आणि कारखानदार यांच्याबाबत असंतोष धुमसत आहे. शेतकऱ्यांचे कापलेले 4 कोटी 70 लाख कारखान्यांनी वेळीच जमा केले नाहीत. तसेच पाटबंधारेने पाणी सोडण्याची पावले लवकर उचलली नाहीत. सुमारे 7 कोटी 23 लाख वीज बिलापोटी 4 कोटी 82 लाख पाटबंधारेने कसेबसे काल भरले. व आज वीज जोडली. अद्याप 2 कोटी रुपये केन अँग्रो, उदगिरी आणि गोपूज कारखान्यांनी देण्याचे मान्य केले आहे. सध्याच्या पाण्यासाठी कोयना नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून साटपेवाडी बंधाऱ्यात पाणी अडविण्यास सुरवात केली आहे. 

अजूनही अडीच कोटींची थकबाकी 
ताकारीचे अद्याप वीजबिल अडीच कोटी देय आहे. केवळ 2015-16 सालातीलच इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची येणेबाकी 3 कोटी आहे. गतवर्षीची इतर पिकांची पाणीपट्टी वेगळीच आहे. अशा शेतकऱ्यांनी रोखीने भरणा करून सहकार्य करावे. तसेच या आवर्तनाचे वीजबिल आणखी वाढणारच आहे. त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांनी रोखीने भरले तरच दुसरे आवर्तन सुरू होईल अन्यथा योजना सुरू होणार नाही. त्यामुळे ऊसऊत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि इतर पीकउत्पादक शेतकऱ्यांच्या 7/12 वर बोजा चढवून वसुलीची कारवाई होईल.

Web Title: Takari in Western Maharashtra to get water supply from Monday