दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

आश्‍वी - पठार भागातील आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहून दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी शिक्षकाला काल रात्री अटक केली. जयराम बबन गोडे (वय ३०) असे शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुक्‍यातील आदिवासी ठाकर समाजातील ही मुलगी शिक्षणासाठी पहिलीपासून पठार भागातील आश्रमशाळेत राहत होती. दहावीत असताना विज्ञान शिक्षक जयराम गोडे याने तिची वारंवार छेड काढली. मात्र, भीतीपोटी तिने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. दहावीचा पेपर संपल्यानंतर २१ मार्च रोजी सायंकाळी शिक्षक गोडे याने तिला विज्ञान प्रकल्पाची फाइल घेऊन त्याच्या राहत्या घरी बोलाविले. घरी गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. उन्हाळी सुटीसाठी पीडित मुलगी २२ मार्च रोजी घरी गेली. आरोपी गोडे याने वारंवार तिच्या मोबाईलवर फोन करून झालेला प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली.

Web Title: Teacher rape of Class X student