शिक्षक बदलीसाठी आता शासनाचे नवे धोरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

सांगली - जिल्हा परिषदेच्या शाळांतील  प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या धोरणात शासनाने बदल केलेत. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने बदल्या होणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांसाठी सध्या कार्यरत असणाऱ्या तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संबंधित शिक्षकांनी उद्या (ता.२८) पासून रविवार (ता. ३०) पर्यंत संगणक प्रणालीमध्ये आवश्‍यक माहिती भरायची आहे. बदली आवश्‍यक असणाऱ्या शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करावा लागेल, त्यानुसार बदल्या केल्या जाणार आहेत.