सोयीची शाळा मिळताच पाऊल मागे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा - अन्यायकारक बदल्या झाल्या आहेत म्हणून विस्थापित शिक्षकांनी न्यायालयीन लढा देण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. तोपर्यंत ग्रामविकास विभागाने संवर्ग चारपर्यंतच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील त्रुटी दूर केल्याने अनेकांची सोय झाली आहे. परिणामी, सोयीची शाळा मिळू लागताच काही शिक्षक न्यायालयीन प्रक्रियेपासून काढता पाय घेऊ लागले आहेत. त्यामुळे बदली प्रक्रिया काही दिवसांत उरकण्याची शक्‍यता असतानाही विस्थापित शिक्षक अद्याप न्यायालयात पोचू शकले नाहीत. 

ग्रामविकास विभागाने ऑनलाइन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्याने त्यात काही प्रमाणात त्रुटी राहिल्या आहेत. त्याचा फटका इतर शिक्षकांना बसत असल्याने तो अन्याय दूर व्हावा, यासाठी अन्यायग्रस्त व बदली प्रक्रियेत खो बसून विस्थापित झालेल्या शिक्षकांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची दारे धुंडाळली आहेत. दरम्यान, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी पुरावेही गोळा करण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाने ता. 17 रोजी झालेल्या बदल्यांतील सुमारे 650 शिक्षकांना बदल्यांचे फेरआदेश दिल्याने काहींना सोयीची शाळा मिळाल्या. त्यामुळे त्यांनी न्यायालयात जाण्यापासून मागे सरकण्यास सुरवात केली आहे. त्यातच ग्रामविकास विभागाने 20 शाळांचे पसंतीक्रम भरण्याचे मुदत गुरुवारपर्यंत दिल्याने शिक्षकांची पंचायत होऊन बसली आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्यापूर्वीच बदल्यांचे आदेश येणार की काय, याची भीतीही शिक्षकांत वाढली आहे. 

मंत्री पंकजा मुंडेंची भेट 
विस्थापित होणारे, तसेच बदलीत अन्याय झालेल्या शिक्षकांनी न्याय मिळण्यासाठी, तसेच बदली प्रक्रियेत तत्काळ बदल होण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली, तसेच जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार यांची भेट घेऊन आज आपले गाऱ्हाणे मांडले. 

Web Title: teacher transfer issue in school