'कर्जमाफी होणार की नाही, हे एकदाच सांगा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

कोल्हापूर -  "दादा, मुख्यमंत्र्यांना सांगून एक तर कर्जमाफी होणार म्हणून तर सांगा, अन्यथा होणार नाही म्हणून तर सांगा,' अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आज केली. कागल पंचतारांकित एमआयडीसीमधील कामगारांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांच्या निधीचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यानंतर झालेल्या चर्चेत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्र्यांशी कर्जमाफीवर चर्चा केली. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, "राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. सरकारही कर्जमाफी होणार-होणार म्हणत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीच्या पीककर्जाची परतफेड केलेली नाही. सरकारनेही कर्जमाफी होणार किंवा नाही, अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. याचा जिल्हा बॅंकांना फटका बसत आहे. सरकारने आता जास्त वेळ न लावता कर्जमाफी होणार असेल किंवा होणार नसेल तर तशी भूमिका जाहीर करावी. सरकारच्या भूमिकेनंतर बॅंकांनी काय करावे, याचा निर्णय घेता येईल.' लोक कर्जाची परतफेड करत नाहीत त्यामुळे बॅंक चालविणे अवघड झाले असल्याचे सांगून आज रात्री मुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत चर्चा करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "कर्जमाफीवर योग्य निर्णय घेतला जाईल. याबाबत मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्हा बॅंकेच्या परिस्थितीबाबत माहिती द्यावी.' या वेळी म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.